कोविड बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण... आयुर्वेदिक ‘आयुष-64’ ठरतय प्रभावी

कोविड बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण... आयुर्वेदिक ‘आयुष-64’ ठरतय प्रभावी



 कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, ‘आयुष-64’ हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे. आयुष मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस), विकसित केलेले ‘आयुष-64’ पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन (एकापेक्षा अधिक वनौषधींचा वापर करून तयार केलेले औषध) हे लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचे देशातील नामांकित संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. सुरुवातीला हे औषध मलेरियासाठी 1980 साली विकसित केले होते आणि आता पुन्हा कोविड-19 साठी याचा वापर करण्यात आला आहे.आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या सहकार्याने सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनात ‘आयुष 64’ च्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक मल्टी सेंटर क्लिनिकल चाचणी नुकतीच करण्यात आली. ‘आयुष-64’ चे परिणाम अत्यंत चांगले असून सद्यस्थितीत गरजू रूग्णांना आयुष 64 चा लाभ मिळाला पाहिजे असे आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि आंतर-शिस्त आयुष संशोधन व विकास कृती दलाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.

समितीने ‘आयुष 64’ च्या निकालाचा काळजीपूर्वक आढावा घेतला असून आणि लक्षणे नसलेल्या, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णाच्या व्यवस्थापनात ‘आयुष 64’ चा उपयोग करण्याची शिफारस केली आहे अशी माहिती एमसीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. कटोच यांनी दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post