जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका....

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका....नगर : सध्या जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. नगर शहरासह श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कोपरगाव तालुक्यांत वादळासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी कांदा भिजला, तर आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. महिनाभरात अवकाळीचा शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा तडाखा बसला.

जवळपास महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे व्यवसायांवर अनेक निर्बंध आले आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळी व सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण राहत होते. हवामान विभागानेही १०, ११ एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.सध्या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कांदा काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. काहींचा कांदाही भिजला. आंब्याच्या कैऱ्याही गळाल्या. यामळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post