सकारात्मक...करोना नियंत्रणासाठी अमरावतीचा लॉकडाऊन पॅटर्न ठरला उपयुक्त...

करोना नियंत्रणासाठी अमरावतीचा लॉकडाऊन पॅटर्न ठरला उपयुक्त...राज्यातही हाच पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनंतर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. अमरावती पॅटर्नप्रमाणे लॉकडाऊन झाल्यास राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, अशी आशा राज्य सरकारला आहे. त्यामुळे यामध्ये थोडेफार बदल करुन हाच पॅटर्न सरसकट वापरला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. यंदा देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी होणारा अमरावती हा बहुधा देशातील पहिला जिल्हा आहे. कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात अमरावतीमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या लॉकडाऊनचा कालावधी आणखी 8 दिवसांनी वाढवण्यात आला. या हिशेबाने अमरावतीत 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला.

या काळात अमरावती शहर आणि अचलपूर तालुका पूर्णपणे बंद होता. येथील कंटेन्मेंट झोनमधील लोकांना तर घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली होती.मात्र, या 15 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अमरावतीमधील कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली. 1 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये कोरोनाचे 92 रुग्ण होते. 5 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा 233 वर पोहोचला. 10 फेब्रुवारीला रुग्णसंख्या 369 तर 20 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये 1058 रुग्ण सापडले. मात्र, 15 दिवसांच्या लॉकडाऊनंतर परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारली. लॉकडाऊनआधी आणि नंतर अमरावती चाचण्याचे प्रमाण सारखेच होते. लॉकडाऊपूर्वी दिवसाला 2500 ते 2600 चाचण्या केल्या जात असत. तेव्हा दिवसाला 900 रुग्ण पॉझिटिव्ह सापडत होते. मात्र, लॉकडाऊननंतर हे प्रमाण 300 ते 350 पर्यंत खाली आले. तर कोरोना पॉझिटिव्हिटी रेटदेखील 48 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत खाली आला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post