मोठी दिलासादायक बातमी...करोनावर परिणामकारक औषध, आपत्कालीन वापरास परवानगी

 मोठी दिलासादायक बातमी...करोनावरील परिणामकारक औषध, आपत्कालीन वापरास परवानगी
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून अलिकडे तर तीन लाखांच्या वर दैनंदिन रुग्णांचा आकडा पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सध्या आपल्याकडे फक्त लशींचा वापर केला जात आहे. . आतापर्यंत कोरोनाविरोधातील लढ्यासाठी कसल्याही प्रकारचे औषध उपलब्ध झाले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या 'विराफीन' (Virafin) या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर रामबाण ठरणारं औषध Virafin ला Drugs Controller General of India ने मंजूरी दिली आहे. झायडल कॅडिला या कंपनीचं म्हणणं आहे की, हे औषध घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आत रुग्णांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह आली असून 91.15 टक्के रुग्णांवर याचा परिणाम दिसून आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post