भगवान महावीर जयंती निमित्त योगासन आणि प्राणायामाची ऑनलाईन कार्यशाळा

 भगवान महावीर जयंती निमित्त योगासन आणि प्राणायामाची ऑनलाईन कार्यशाळानगर : भगवान श्री महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक निमित्त नगर शहर धर्म जागरण समितिच्या वतीने दि.२५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता ऑनलाईन  योगासन कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत औरंगाबाद येथील जनकल्याण समितीच्या योगकेंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विवेक चर्जन  मार्गदर्शन करणार आहेत . या ऑनलाईन योगासन कार्यशाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे श्वसन प्रकार व योगासन प्रकार घेण्यात येणार आहेत.  वर्ग संपल्यावर आपल्या कोरोना संबंधित शंका आणि प्रश्नांची उत्तरेही मिळतील. कोविड काळात स्वताचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने सदर योगासन कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

यात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग होऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन नगर शहर धर्म जागरण प्रमुख प्रफुल्ल सुरपुरीया यांनी केले आहे. ज्यांना योग कार्यशाळेत सहभागी होण्याची इच्छा आहे  त्यांनी  9822254190 या मोबाईल नंबर वर आपले पूर्ण नाव व्हॉट्सऍप करावे. अधिक माहितीकरिता कॉल करावा.


Time: Apr 25, 2021 08:15 AM


Meeting ID

https://us02web.zoom.us/j/84441884411?pwd=djlDd0U4MUltaVk1SDJubVRkeXJkUT09


Meeting ID: 844 4188 4411

Passcode: 1234

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post