खळबळजनक...आता सचिन वाझेंचाही लेटर बॉम्ब.... शिवसेनेचे मंत्री अनिल परब अडचणीत

 आता सचिन वाझेंचाही लेटर बॉम्ब.... शिवसेनेचे मंत्री अनिल परब अडचणीतमुंबई : परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझेच्या लेटरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही परब यांनी म्हटलंय. 

पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय.इतकंच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केलाय. मुंबई मनपाच्या कंत्राटदारांकडून वसुली करून देण्यास परब यांनी सांगितले असे वाझे यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post