सकारात्मक बातमी...करोनाची आताची लाट प्रचंड वेगाने ओसरेल

सकारात्मक बातमी...करोनाची आताची लाट प्रचंड वेगाने ओसरेल नवी दिल्ली - सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत आहे. पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेबाबत एका संशोधनामधून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

क्रेडिट सुसेच्या एका संशोधनानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या गतीने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकते, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. तसेच एप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित होतील, असा अंदाज या संशोधनामधून वर्तवण्यात आला आहे. 

या संशोधनामध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१ टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित झालेली होती. एप्रिलच्या अखेरीच यामध्ये ७ टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे. तर लसीकरणाच्या माध्यमातून देशातील १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील ४० टक्के लोकसंख्या ही कोरोनापासून मृत्यूच्या धोक्याबाहेर जाईल. एवढेच नाही तर २८ टक्के लोकसंख्येमध्ये संसर्गामुळे प्रतिकारशक्ती विकसित होई शकते. त्याशिवाय १२ टक्के लोक हे एप्रिलपर्यंत कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतील. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post