बाजार समिती आली धावून....वाळूंजला १०० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित

 बाजार समिती आली धावून....वाळूंजला १०० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वितनगर. - महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आले हि कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन बरोबर आयसोलेशन कोवीड सेटंरची गरज आहे . तसेच ग्रामीण भागातील नागरिकाना उपचारची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने कै. दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीने वांळुज येथील रामसत्य लॉन येथे शंभर बेडची व्यवस्था केली असल्याचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सांगीतले. 

वांळुज ( ता. नगर ) येथील रामसत्य लॉन येथे कै. दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शंभर बेडचे कोवीड आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले यावेळी ते बोलत होते . या सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते , आ.संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कर्डीले म्हणाले नगर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे . ऑक्सीजन तसेच इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरिक घरीच उपचार घेत आहे . यामुळे त्याचा स्कोर ही वाढत चालला आहे . या रुग्णाच्या संसर्गमुळे  घरातील लोकाना तसेच परीसरात ही रुग्ण संख्या वाढत आहे . हि चेन वाढत चालली आहे . शहरा तील रुग्णालये ग्रामीण भागातील रूग्णाना उपचार घेण्यासाठी परवडत नाही . या रुग्णांची सोय व्हावी या हेतुने बाजार समितीच्या वतीने कोवीड सेंटर सुरू केले.
घिगे म्हणाले या सेंटरच्या माध्यमातुन नगर तालुक्यातील रूग्णांना सर्व  सुविधा मोफत उपलब्ध करुन देणार आहोत . शहरात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे शंभर बेडची व्यवस्था केली .आजुन दोन दिवसात शंभर बेड असे दोनशे बेड उपलब्ध करुन देणार आहोत . तालुक्यात गरज असेल त्या ठिकाणी कोवीड सेंटर उभे करणार असल्याचे सभापती घिगे यांनी सांगीतले . यावेळी अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डीले, बाबा पाटील खर्से, रेवणनाथ चोभे, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, शरद बोठे, सुभाष निमसे, महादेव शेळमकर, बाळासाहेब दरेकर, विजय शेळमकर, नवनाथ हिंगे, राजु हिंगे, विकास म्हस्के, भरत दरेकर, रमेश दरेकर,सुखदेव दरेकर, अनिल मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती माडगे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, नायब तहसील माधव गायकवाड, रुई छत्तीशी सरपंच मंडल अधिकारी वैशाली साळवे, वाळूंज उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी योगिता चौकडे, आरोग्य सेविका उषा सावंत, वाळकी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल ससाणे, ग्रामसेविका अश्विनी बरबडे, तलाठी मोहसीन पठाण, उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post