वालेकर कुटुंबाची सर्व विधींना फाटा देऊन मातोश्री वृद्धाश्रमास मदत

 वालेकर कुटुंबाची सर्व विधींना फाटा देऊन मातोश्री वृद्धाश्रमास मदत अहमदनगर - स्टेशन रोड परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर राहणारे कै.मधुकर बाजीराव वालेकर यांचे दि 9 एप्रिल 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन दुःखद निधन झाले. या दुःखद घटनेनंतर वालेकर कुटुंबाने समाजाला एक आदर्श घालून देण्यासारखे काम केले आहे. कै.मधुकर वालेकर यांचे मुले श्री राजेंद्र वालेकर व ऍड.संजय वालेकर यांनी दशक्रिया विधी व तेरावाच्या कार्यक्रमाला फाटा देऊन विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमाला मदत दिली. यावेळी रेल्वे स्टेशन येथीलज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के डी खानदेशी, श्री.काविटकर साहेब, ऍड.संजय वालेकर, श्री.शैलेश गवळी, प्रा.डॉ.विजय म्हस्के उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post