भुकेने व्याकूळ झाल्याने सरणावरील मृतदेहाचे अवशेष खाणार्या युवकाचे पुनर्वसन


भुकेने व्याकूळ झाल्याने सरणावरील मृतदेहाचे अवशेष खाणार्या युवकाचे पुनर्वसन सातारा : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचे पूनर्वसन आता वाईतील यशोधन संस्थेत करण्यात आले.

कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी कोळकी ग्रांमपंचायतची संमाशानभूमी घेतली आहे. या ठिकाणी रोजच कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यविधी केला जातो. या स्माशानभूमीत अंदाजे २० वर्षाचा तरुण मुलगा जळत असणार्‍या सरणातून काढून काहीतरी खात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याला नगर पालिकेच्या कर्मचार्‍यानी हटकले परंतु त्याला लागलेल्या भुकेने तो व्याकुळ झाला होता. त्याला त्या ठिकाणाहून हटकुन पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post