'प्राणवायू'साठी विखे पाटील परिवार सरसावला...विळद घाटात दीड कोटींचा प्लांट

 

'प्राणवायू'साठी विखे पाटील परिवार सरसावला...विळद घाटात दीड कोटींचा प्लांटनगर  : कोव्हीड संकटाच्या काळात निर्माण झालेल्या आॅक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परीवाराच्या वतीने सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून आॅक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून दहा दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.


सर्वच रुग्णालया समोर सध्या आॅक्सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शासकीय पातळीवरूनही आॅक्सिजन उपलब्ध होण्याच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेवून विळद घाटात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला  संपूर्ण आधुनिक परदेशी तंत्रज्ञान वापरून हा जिल्ह्य़ातील पहीलाच प्रकल्प ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सद्यस्थितीत विळद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये १५० आॅक्सिजनचे बेड आहेत.नविन आॅक्सिजन प्रकल्प उभारल्यानंतर ही बेडची  संख्या ३०० करणार येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.जिल्ह्य़ात अवघ्या दहा दिवसात कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पाचा मोठा दिलासा नागरीकांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post