खा.सुजय विखे पाटील यांनी केली कोविड रूग्णांची आपुलकीने विचारपूस

 खा.सुजय विखे पाटील यांनी केली कोविड रूग्णांची आपुलकीने विचारपूस
खा. सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील मिरजगाव, महिजळगाव, कर्जत शहर व राशीन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण व कोविड सेंटरला भेट दिली.


येथील कोरोना योद्ध्यांशी संवाद साधला आणि या कठीण परिस्थितीत ते करत असलेल्या कामाबाबत त्यांचे आभार मानले. तसेच तेथील लसीकरण केंद्रांची पाहणी करून त्यांना उद्भवत असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष  नामदेव देवा राऊत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष  अशोकराव खेडकर, प. स. सभापती  शाम काणगुडे, श्री. दत्ता गोसावी, श्री. शहाजी राजे भोसले, भाजपा शहराध्यक्ष श्री. बापूराव धोंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. प्रकाश शिंदे, श्री. प्रकाश कदम, प्रांताधिकारी सौ. अर्चना नष्टे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुंड, गटविकास अधिकारी श्री. अमोल जाधव, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण जाधव, पोलीस निरीक्षक श्री. यादव, विविध पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post