'ते' पत्र म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न, विखेंचा थोरातांना टोला

'ते' पत्र म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न, विखेंचा थोरातांना टोला नगर: कोविडच्या सुविधांचा अभावाबाबत मंत्री थोरातांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री थोरातांचे नाव न घेता केली. लोणी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

आ. विखे बोलतांना म्हणाले, करोनाला आता एक वर्ष होऊन गेले आहे, तुम्हाला कोविडच्या सुविधांचा अभाव आता कळला का? स्वतःचे अपयश आणि अब्रू झाकण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची टीका त्यांनी केली. यावेळी लसीकरण, ऑक्सिजन तुटवडा, लॉकडाऊन काळातील मदत यावरूनही आ.विखे यांनी राज्यसरकारवर टीका केली.दरम्यान, खा.डॉ.सुजय विखे यांच्या रेमडीसीविर खरेदी प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणार नाही असे सांगताना त्यांनी त्यांनी सुजयने मानवतेच्या दृष्टीने ते केले असून आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post