मंत्र्यांनी बदल्यातील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे.... Video

 मंत्र्यांनी बदल्यातील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे 

खा.डॉ. सुजय विखे यांचा बाळासाहेब थोरातांना टोला  श्रीगोंदा-  रेमडिसिव्हीर मिळत नसताना मी विमानाद्वारे 15 लाख खर्चून 2000 इंजेक्शन आणले नगर सिव्हिल,साईबाबा संस्थान रुग्णालयात तसेच रूग्णांना पोहोचवले ते ही राज्यात आमची सत्ता नसताना , मंत्रिपद नसताना मग रेमडीसीविर मिळत नाही असं ओरडत बसण्याऐवजी बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा.  असा टोला खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना विशेषतः नामदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

            शनिवारी खासदार विखे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा,  कोळगाव,घारगाव,लोणी व्यंकनाथ , बेलवंडी, मढेवडगाव, येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी लोणीव्यंकनाथ येथील बाळासाहेब नाहटा यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये प्रसारमध्यमांशी बोलताना वरील टोला लगावला.

            जिल्ह्यात अनेकांनी कोविड सेंटर सुरू केले पण शासकीय मदत घेतली पण बाळासाहेब नाहटा यांनी पुढे येऊन यांनी स्वखर्चाने सेंटर सुरू केले ते कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी नाहटा यांचा आदर्श घ्यावा.  इतर सेंटरला ऑक्सिजनसिलेंडर अडचण असताना नाहटा यांना अडचण येत नाही ते इतर सेंटरला देखील सिलेंडर पुरवतात याचेही कौतुक केले. श्रीगोंदा तालुक्यात ठीक ठिकाणी सेंटर झाले तर नगरला रुग्णाची गर्दी कमी होईल. या सेंटरला विखे यांनी 50 हजाराची मदत जाहीर केली in   आमदार बबनराव पाचपुते,अण्णासाहेब शेलार,,बाळासाहेब पाटील,भगवानराव गोरखे आदी यावेळी उपस्थित होते.

Video

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post