वखार महामंडळाच्या गोदामालााआग... मोठं नुकसान

 

वखार महामंडळाच्या गोदामाला आग... मोठं नुकसान संगमनेर :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत गोदामात ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे धान्य जळून खाक झाले आहे, सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.

बाजार समितीच्या आवारात असणार्‍या या गोदामांमध्ये शेतकर्‍यांचे धान्य, कापूस साठवून ठेवण्यात येतो. काल रात्री या गोदामाला अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व धान्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिका, थोरात साखर कारखाना, विखे साखर कारखाना, अकोले कारखाना यांचे अग्निशामक दल बोलावण्यात आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांचेसह पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व बाजार समितीचे सचिव सतीष गुंजाळ व अन्य अधिकारी घटनास्थळी धाव घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post