समनापूरमधील प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील

समनापूरमधील प्रसिद्ध वडापाव सेंटर बंद, गर्दीमुळे प्रशासनाची कारवाई नगर : संगमनेरजवळील समनापूर येथे सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध नशिब वडापाव सेंटर येथे वडापाव खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे आढळून आले. संबंधीत वडापाव सेंटर चालकाने करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे नियम न पाळल्याने सदर वडापाव सेंटर सात दिवसांसाठी प्रशासनाने सील केले आहे.

सदर वडापाव सेंटरवर वडापाव खरेदी करणार्‍यांनी सामाजिक अंतर न ठेवता, मास्क व सॅनिटायझरचा वापर न केला नसल्याचे आढळले. अंदाजे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा करुन घोळक्याने वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या पथकाने जावून सदर वडापाव सेंटरचा पंचनामा केला. सदर अस्थापनेने करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने नशिब वडापाव सेंटर मौजे समनापूर हे दुकान 5 मार्चपासून पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post