१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण, २४ एप्रिल पासून ऑनलाईन नोंदणी

१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण, २४ एप्रिल पासून ऑनलाईन नोंदणी नवी दिल्ली : येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सर्वांना 24 एप्रिलपासून आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. ही नोंद केंद्र सरकारच्या कोविन अॅप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर करता येणार आहे.देशात 1 मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार असून त्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आता राज्यांना थेट कंपन्यांकडून कोरोनाची लस खरेदी करण्याची मूभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार आता राज्य सरकार खुल्या बाजारातून लस खरेदी करू शकतात. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post