लसीचा एक डोसही संसर्गाचा धोका निम्म्याने कमी करतो...

 लसीचा एक डोसही संसर्गाचा धोका निम्म्याने कमी करतो...अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनच्या सर्वेक्षणातही कोरोना लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीचा फक्त एक डोस घेतला तरी कोरोना संसर्गाचा धोका निम्म्याने कमी होत असल्याचे ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’च्या अभ्यासात आढळले आहे.ब्रिटनमध्येही राष्ट्रीय आरोग्य सेवेमार्फत कोरोना लसीकरणाला गती दिली आहे. या मोहिमेंतर्गत लसीचा एक डोस घेतलेल्या लोकांपैकी ज्यांना पुढील तीन आठवडय़ांत कोरोनाची लागण झाली त्यांच्यापासून लस न घेतलेल्या इतर लोकांना संसर्ग होण्याची शक्यता जवळपास 38 ते 49 टक्क्यांपर्यंत कमी झाली. तसेच लसीचा एक डोस संसर्गाचा धोका 50 टक्क्यांनी कमी करतो. म्हणजेच लस घेणारी व्यक्ती स्वतःसह आपल्या कुटुंबीयांनाही कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवते, असा दावा ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी केला. सर्वेक्षणातील या निष्कर्षांचा सध्या तज्ञांकडून आढावा घेतला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post