वयाचे निकष पूर्ण न करणार्या फडणवीस यांच्या पुतण्याला कलह कशी दिली जाते? कॉंग्रेसचा निशाणा

 वयाचे निकष पूर्ण न करणार्या फडणवीस यांच्या पुतण्याला कलह कशी दिली जाते? कॉंग्रेसचा निशाणामुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्याच फोटोवरून आता महाराष्ट्र काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांना कचाट्यात पकडलंय. 45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, असा सवालच काँग्रेसनं उपस्थित केलाय. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!, असंही टीकास्त्र काँग्रेसनं ट्विट करत सोडलंय.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय 25 वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. परंतु विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते. तोच फोटो ट्विट करत काँग्रेसनं आता देवेंद्र फडणवीसांनाच घेरलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post