करोनाची लस घेतल्यावर मिळतय आकर्षक भेटवस्तू, लोकांनी लावल्या रांगा

करोनाची लस घेतल्यावर मिळतय आकर्षक भेटवस्तू, लोकांनी लावल्या रांगा राजकोट (गुजरात) : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. अधिकाधिक लोकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी सरकारसह इतर लोकही पुढाकार घेत आहे. कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या राजकोटमधील स्वर्णकार समाजाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरण कॅम्पमध्ये येणार्‍या लोकांना विशेष भेटवस्तूही दिल्या जात आहेत.

 स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट शहरात कोरोना लसीकरण शिबिर सुरु करण्यात आलं आहे. या शिबिरात लसीकरण करणार्‍या महिलांना सोन्याचे नोझपिन (नथ) देण्यात येत आहे. त्याचवेळी लस घेणाऱ्या पुरुषांना भेटवस्तूमध्ये हॅण्ड ब्लेंडर देण्यात येत आहे. राजकोटच्या स्वर्णकार समुदायाने भेटवस्तू जाहीर केल्यापासून नागरिकांनी या शिबिरात गर्दी केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post