चांगले विचार ठेवा, महामारीतून चांगला मार्ग निघेल

 --------ह भ प श्री राम महाराज उदागे -------


🚩 *सकारात्मक विचार ठेवणे काळाची गरज*                सध्याचा काळ जीवन जगण्यासाठी अतिशय कठीण असून , अनेक चिंता मानवासमोर आहेत .या विज्ञान युगात अतिशय प्रगती झाली असली तरीसुद्धा आज जीवन कसे जगावे , काय करावं , काय होईल असे अनेक प्रश्न माणसा समोर आ वासून उभे आहेत . मानवाला जीवन जगणं अतिशय कठीण होत चाललेल आहे . वेळोवेळी अनेक प्रकारचे संकट मानवी जीवनामध्ये उभे राहताना दिसत आहेत . अशावेळी गरज आहे ती *दुवा* आणि *दवा* या गोष्टीची परंतु सगळ्याच गोष्टी औषधाने बर्या होत नाही . त्या करतात गरज असते चांगल्या *विचारांची* म्हणून असं म्हटले आहे *ज्याचे विचार सुंदर तोच खरा सुंदर* म्हणूनच धकाधकीच्या कालावधीमध्ये *सकारात्मक* विचार असणं ही काळाची गरज आहे . आज प्रत्येकाने एकमेकांशी बोलताना चांगलं बोललं पाहिजे . सध्या कोरोना नावाच्या महामारीन हाहाकार घातला आहे . सगळीकडे कोरोणाची चर्चा आहे . आज ईकडे इतके मृत्यू झाले , आज याला कोरोना झाला अशा अनेक गोष्टी चर्चा चालू असतात , परंतु मला एक प्रश्न पडला आहे कि कोरोनाच्या आगोदरही मृत्यू होत होते ते आता बंद झाले म्हणावे की काय , अगोदर चे आजार सगळेच पळून गेले की काय , तर नाही शहरी भागामध्ये आज सगळे अंत्यविधी हे शहरी स्मशानभूमीत होतात , त्यामुळे जास्त मृत्यू झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे . कोरणा नाही असं नाही निश्चित आहे . परंतु सगळेच मृत्यू कोरोनाने होत नाहीत ,  म्हणून आपण चांगले विचार ठेवून जर मार्गक्रमण केलं तर याही महामारी तून आपल्याला चांगला मार्ग दिसेल . *फक्त आपण काळजी घेणे आणि सकारात्मक विचार करणं ही गरज आहे* त्याकरता मास्क वापरणे गरजेचे आहे .मास्क काढण्याच्या अगोदर हात स्वच्छ धुणे , गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे उपाय सध्यातरी दिसत आहेत . मानवाचे विचार चांगले होण्याकरता ज्ञानेश्वरांची *ज्ञानेश्वरी* जगद्गुरू तुकोबाराय यांची *अभंग गाथा* नाथ महाराजांचे *भागवत* भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली *श्रीमद् भगवतगिता* असे अनेक ग्रंथ आपल्याला चांगले विचार देऊ शकतात  . म्हणून सध्या तरी मानवाने आपल्या जीवनात या ग्रंथांचे पारायण करून आपले विचार चांगले कसे होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे . त्याचबरोबर थोडास आयुर्वेदिक गोष्टीकडे लक्ष देऊन *तुळशीचा काढा , गरम पाण्याची वाफ त्याचबरोबर ऑक्सिजन लेवल वाढवण्याकरता थोडासा व्यायाम करणे जरुरी आहे* आपण सगळे नक्की कराल अशी आशा बाळगतो .

धन्यवाद 

🌹 *राम कृष्ण हरी* 🌹

 *ह भ प श्री राम महाराज उदागे* 

जिल्हा उपाध्यक्ष - 

अखिल भारतीय वारकरी मंडळ अ .नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post