टंकलेखन संगणक टंकलेखन इन्स्टिटयुट चालकांना प्रत्येकी 50 हजारांची मदत करावी - प्रकाश कराळे

  

 टंकलेखन संगणक टंकलेखन इन्स्टिटयुट चालकांना मदत करावी - प्रकाश कराळेनगर-  ब्रेक द चेन नियमावली जाहीर करताना शासनाने मदत केलेल्या घटकात शासनमान्य विनाअनुदानित शासनाचे प्रशिक्षण देणाऱ्या विना अनुदानित  संस्थाचा विचार करावा अशी मागणी  राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिनांक 16 मार्च 2020 पासून कोराना सारख्या आजारामुळे टंकलेखन व संगणक संस्था बंद आहेत.  शाळा कॉलेज बंद असल्यामुळे संगणक संस्थेमध्ये कोर्सला येणाऱ्या विदयार्थ्यांनी कोर्सकडे पाठ फिरवली असून शासनमान्य परंतु कायम स्वरुपी विना अनुदानित अशा संस्थांना अदयाप पर्यंत कोणीही कोणत्याही प्रकारची मदत जाहिर केलेली नाही किंवा मदतीचा हात पुढे केलेला नाही.  महाराष्ट्रामध्ये 3500 शासन मान्यता प्राप्त संस्था असून यातील 3000 ते 3100 संस्था या भाडे तत्वावरील जागेत चालविल्या जात आहेत. टाईपरायटर मशीन फर्निचर बाजूला ठेवून मोठया प्रमाणावर खर्च करुन नुकत्याच संगणक टायपिंग मध्ये अर्थात डिजीटल भारत पेपरलेस टायपिंग मध्ये रुपांतर करण्यात आले होते. आता कुठे थोडी व्यावसायिक प्रगतीपथावर येत होते.  परंतु मध्येच कोविड सारख्या आजाराने तोंड वर काढले.

संगणक टायपिंग सुरु झाले पासून टाईपरायटर ऐवजी संगणक सेटअप, बॅटरी, इनव्हर्टर, इंटरनेट सेवा, प्रत्येक क्लासमध्ये किमान २ इनस्ट्रक्टर असा बरेच मोठया प्रमाणावर खर्चाचा बोजा संस्था चालकांवर पडलेला आहे. 

15 एप्रिल पासून पुन्हा राज्यात लॉकडाऊन सुरु झाले असून शासनाने बरेच व्यावसायिक यांना मदतीचा हात दिला आहे. तुटपुंज्या स्वरुपात मदती जाहिर केल्या आहेत.  त्याच प्रमाणे टंकलेखन संगणक इन्स्टिटयुट चालकांना  देखील किमान क्लासचे भाडे, इंटरनेट खर्च, लाईट बील खर्च आणि निर्देशक पगार यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्यकी 50हजार रुपये जाहिर करुन 3500  संस्थाचालक, 10 हजार निदेशक यांना दिलासा द्यावा  ही मदत ऑन लाईन स्वरुपात प्रत्येक संस्थाचालकांच्या खात्यामध्ये समाविष्ट करण्यात यावी. सर्व संस्थाचे रेकॉर्ड व बँक खात्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या स्वायत्त संस्थेकडे उपलब्ध आहे   तरी राज्य टंकलेखन संघटना व संलग्न सर्व जिल्हा संघटनेच्या वतीने कळकळीची विनंती या होतकरुन संस्थाचालकांना  आर्थिक अडचणी मधून बाहेर काढण्यास मदत करावी. ही विनंती. 

कळावे.

आपला विस्वासु,

प्रकाश कराळे,

अध्यक्ष.

9422221908

karaleprakash1908@gmail.com

1/Post a Comment/Comments

  1. विद्यार्थी ची क्लास ची फी पण कमी करावी

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post