राज्यात 'टोटल' लॉकडाऊनची चर्चा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

 राज्यात 'टोटल' लॉकडाऊनची चर्चा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठकमुंबई: राज्यात कठोर निर्बंधांसह विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतं आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाउन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.

पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लाँकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. उद्याच्या बैठकीत मागील वर्षी जसा कडक लॉकडाऊन होता तसा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post