नवीन शैक्षणिक सत्र १४ जून पासून, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर

 विद्यार्थी वर्गोन्नत करावयाचे असल्याने  निकालाबाबत घाई नको.


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सुटट्या शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.      शिक्षण संचलनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी क्र.अमाशा/शासु/2021/एस1/1558 दिनांक 30 एप्रिल 2021या परीपत्रकान्वये 1 मे ते 13 जून पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 14 जून  पासून शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरू होईल. तर विदर्भातील शाळा 28 जून रोजी सुरू होतील.


      कोवीड 19 संसर्गामुळे शाळा बंद आहेत. सन 2021-22 शैक्षणिक सत्र सुरू करताना कोवीड 19ची परिस्थिती लक्षात घेऊन शासन स्तरावरून जे आदेश निर्गमीत होतील त्याची शिक्षण संचलनालयाकडून वेळोवेळी कळविण्यात येतील.

       शाळांना सुट्टी लागली असली तरी निकाला बाबत परीक्षा मंडळाचे 21-03-2021 चे परिपत्रक, महाराष्ट्र शासनाचे 8 एप्रिल 2021चा शासननिर्णय व वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परीपत्रकान्वये न 1 ते 8 व 9-11 चे निकाल तयार करावेत. पण कोणत्याही शिक्षकांस शाळेत न बोलावता लाॅकडाऊन नंतर ते तयार करण्यात यावे. तसेच शासनाने वर्गोन्नत करावयास सांगीतले असल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नत करून कोवीड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर फिजीकली शाळा सुरू झालेनंतर निकाल देण्यात यावा अथवा,  सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठवावा. सद्य परिस्थितीत शिक्षकांना शाळेत बोलावून शासन नियमाचे उल्लंघन करू नये.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post