'सिरम'च्या लसीची किंमत जाहीर, वाचा सविस्तर...

 'सिरम'च्या लसीची किंमत जाहीर

, राज्य सरकारला ४०० तर खाजगी हॉस्पिटल्सना ६०० रुपये मोजावे लागणारपुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा एक डोस राज्य सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपयांना तर खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस घ्यावे लागणार आहेत. 


सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी सांगिंतलं की, येत्या दोन महिन्यात आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादन क्षमतेच्या एकूण 50 टक्के लसी या भारत सरकारला देण्यात येतील तर 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील. 


सीरम इन्स्टिट्यूटने असा दावा केला आहे की, त्यांची लस जगातील इतर लसींच्या तुलनेत स्वस्त आहे. जागतिक लसींचा विचार करता अमेरिकेत फायझर आणि मॉडर्नाची लस ही 1500 रुपयांना मिळते तर रशियाची स्पुटनिक व्ही लस ही 750 रुपयांना मिळते. तसेच चीनच्या लसीची किंमतही 750 रुपये इतकी आहे. त्यामुळे भारतात विक्री करण्यात येणारी कोविशिल्ड त्या तुलनेत स्वस्त आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post