वादग्रस्त नित्यानंद स्वामीच्या देशात भारतीयांना प्रवेश बंदी

 वादग्रस्त नित्यानंद स्वामीच्या देशात भारतीयांना प्रवेश बंदी



कैलासा: बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी नित्यानंद स्वामीने वसवलेल्या कैलासा देशात भारतीयांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आणि करोनाचा संसर्ग कैलासा बेटावर फैलावू नये यासाठी ही बंदी घातली गेली असल्याचे स्पष्टीकरण 'कैलासा'च्यावतीने देण्यात आले आहे. भारतीयांसोबत ब्राझील, युरोपीयन युनियन आणि मलेशियातील भाविकांना, प्रवाशांना ही बंदी लागू असणार आहेे

.ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. कैलासाच्या राष्ट्रपतींच्या आदेशाने ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे म्हटले गेले आहे. सोशल मीडियावर या आदेशाची खिल्ली उडवण्यात येत आहे. कैलासा देशाने काढलेल्या या आदेशाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post