एसटी बस पलटी होऊन अपघात, १० ते १२ प्रवासी जखमी

 एसटी बस पलटी होऊन अपघात, १० ते १२ प्रवासी जखमीनगर : एसटी महामंडळाची श्रीरामपूर-अहमदनगर एसटी बस राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ अचानक पलटी झाली.

या अपघातात अंदाजे 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळली आहे. याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर कडून अहमदनगरकडे जाणारी एसटीबसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक भुजडी पेट्रोल पंप जवळील ओढ्यात पलटली. यात बस मधील दहा ते बारा प्रवाशांना उपस्थित नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमी प्रवाश्यांवर राहुरीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

बस पलटी झाल्यानंतर क्रेनच्या साह्याने ओढ्यातून बाहेर काढण्यात आले. राहुरी फॅक्टरीकडून येणारी सर्व वाहतूक यावेळी ठप्प झाली होती. राहुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी खरात व इतर सहकार्‍यांनी तसेच माजी नगरसेवक नितीन तनपुरे, राजू गुंजाळ, विजय मुथा, राजू तनपुरे, सचिन भुजडी, अजिंक्य भुजडी, महेश वराळे आदींनी जखमींना बाहेर काढण्यात मोठे परिश्रम घेतले. बस चालकाला अचानक चक्कर आल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post