दुकान फोडून ११ लाखांचे टायर्स व इतर साहित्याची चोरी

दुकान फोडून ११ लाखांचे टायर्स व इतर साहित्याची चोरीनगर: शेवगाव येथील नाथ टायर्स दुकानाच्या शटर्सच्या पट्टया तोडून 11 लाख 10 हजार किमंतीचे टायर्स व टायर्सच्या टयुब यासह अन्य साहित्याची  चोरी झाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पाथर्डी रस्त्यावरील तहसिल कार्यालयासमोरील नाथ टायर्स या दुकानात ही चोरी झाली.

दुकानाचे मालक अभिजीत गर्जे (रा.निपाणी जळगाव,ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवात रात्री आठच्या सुमारास नाथ टार्सचे दुकान बंद करुन गावी गेलो होतो. शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी मी व कामारील सहकारी सतीष पिसोटे आलो असता, दुकानाच्या शटरच्या लोखंडी पट्टया तुटलेल्या दिसल्या व शटर एक फुटवर केलेले दिसले.

तुटलेले शटर उघडून पाहिले असता दुकानातील टायर दिसले नाहीत. तर काही टायर अस्ताव्यस्त पडलेले व विखुरलेले दिसले. अज्ञात चोरटयांनी दुकानातील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर्स व इतर साहित्य असा 11 लाख 10 हजार रुपये किमंतीचा ऐवज चोरीस गेले आहे. यावरुन गर्जे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post