शेवगावमध्ये ‌घुले पाटलांचा पुढाकार, १०० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर कार्यान्वित

 शेवगावमध्ये ‌घुले पाटलांचा पुढाकार, १०० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर कार्यान्वित

शेवगाव -   वाढती कोरोना बाधितांची संख्या व अपुर्‍या पडणार्‍या आरोग्य सुविधा यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून शहरातील स्व. मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज बुधवार दि. 21 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

शेवगाव शहर व तालुक्यात खाजगी सात व शासकीय तीन कोविड सेंटर कार्यरत आहेत. आता माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून शेवगाव शहरातील स्व. मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
दोन दिवसापुर्वी ज्ञानेश्वरचे अध्यक्ष माजी आ. नरेंद पाटील घुले यांनी कोविड सेंटरच्या जागेची पाहणी करून काही सुचना केल्या होत्या. कोविड सेंटरची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर आज बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी, वैद्यकीय अधिक्षक रामेश्वर काटे, विस्ताराधिकारी शैलेजा राऊळ उपस्थित होते.
तसेच बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. अनिल मडके, संचालक तथा युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, संचालक संजय फडके, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, कमलेश लांडगे, वहाब शेख, समीर शेख, संतोष जाधव, अभिजीत आरेकर, मेघा कांबळे आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post