अभिनेत्री शशिकला यांचं निधन
मुंबई: आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे.
आज दुपारी 12 वाजता कुलाबा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या. त्यांच्या खलनायिकांच्या भूमिका त्या काळात प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. सोलापूरमध्ये 4 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म झाला होता. शशिकला यांना सहा बहिण आणि भाऊ होते.
‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (2003) आदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे.
Post a Comment