'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या' माध्यमातून 'सेवा यज्ञ', माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पुढाकार

'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या' माध्यमातून 'सेवा यज्ञ', माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पुढाकारमुंबई:  कोरोना महामारीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संकट लक्षात घेऊन परळीत कोरोना रूग्णांसाठी 'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या' माध्यमातून 'सेवा यज्ञ' सुरू करणार आहे, अशी माहिती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या परंतू कोरोना पाॅझेटिव्ह  असलेल्या रूग्णांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उभारण्याचे  तसेच बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोहोचविण्यात येणार आहेत.

मी व खा. डाॅ. Pritam Gopinath Munde सध्या क्वारंटाईन आहोत, परळी मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्चुअल बैठक घेऊन संवाद साधला व सध्याच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीस अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोना रूग्णांबद्दल प्रचंड सहानुभूती व सेवा करण्याचा त्यांचा उत्साह यावेळी दिसून आला.


   बैठकीच्या सुरवातीला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कोरोना आजाराने नुकतेच निधन झालेले अंगरक्षक गोविंद मुंडे, कासारवाडीचे प्रभू दहिफळे तसेच ज्ञात-अज्ञात नागरिकांना याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली. गोविंदच्या निधनाबद्दल अतिशय सहानुभूती पूर्वक धीर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांनी कौतुक केले.


 सर्वप्रथम कोरोना काळात सर्वाना स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले. लाखो गेले तरी चालतील लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे अशी भावना काहींनी व्यक्त केल्यावर त्यांनी लाखो जगले पाहिजेत आणि पोशिंदाही, त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत असे सांगितले. येणाऱ्या काळात कोरोनाला लढा देत असताना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजसेवा करण्याचे मुर्तीमंत उदाहरण बनावे. प्रितमताई यांनी खासदार या नात्याने स्वतः लक्ष घालून कोविड केंद्रात जाऊन रूग्णांना धीर देण्याचे उत्कृष्ट कार्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post