सावेडी कचराडेपो जागेत आता कोरोना मयतांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था

 सावेडी कचराडेपोत कोरोना रूग्‍णावर अंत्‍यविधी आजपासून सरू करणार – आ.संग्राम जगतापनगर -   कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया वाढत असल्‍यामुळे मनुष्‍याच्‍या आरोग्‍यावर वि‍परित परिणाम होत आहे. नगर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातून  अतिदक्ष कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी शहरात येत आहेत. उपचार घेत असताना काही कोराना रूग्‍णांचा दुदैवी मृत्‍यू होत आहे. त्‍यामुळे नालेगांव अमरधाम येथे अंत्‍यविधीसाठी व्‍यवस्‍थेवर ताण निर्माण झाल्‍यामुळे कोरोना रूग्‍णांची अंत्‍यविधी करण्‍यासाठी वेळ लागत आहे.  नातेवाईकला आपला माणुस गेल्‍याचे दु:ख मोठे असते त्‍याचच गैरसोय होत आहे. यासाठी काल जिल्‍हाधिकारी श्री.राजेंद्र भोसले यांचे समवेत सावेडी कचरा डेपो येथे पाहणी करून कोरोना रूग्‍णावर अंत्‍यविधी करण्‍यासाठी सुचना दिल्‍या असता आज दिनांक 26/4/2021 रोजी कचरा डेपोच्‍या शेड मधील साफ सफाई करून अंत्‍यविधीला सुरूवात करण्‍यात येणार असल्‍याचे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले.

      सावेडी कचरा डेपो येथे कोरोना रूग्‍णांवर अंत्‍यविधीसाठीच्‍या जागेची पाहणी करून साफ सफाई करण्‍यात आली. यावेळी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर, उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे, विद्युत विभाग प्रमुख श्री.राजेंद्र मेहेंत्रे, घनकचरा व आग्निशमन  विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

      विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर म्‍हणाले की, सावेडी कचरा डेपो मुळे या भागाच्‍या वि‍कास कामावर मोठा परिणाम झाला होता. कचरा डेपोच्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम झाला होता. वारंवार कचरा डेपोला लागलेल्‍या आगीमुळे दुर्गंधी पसरली जात होती. त्‍यामुळे या भागातील नागरिकांच्‍या विरोधामुळे डेपो व खत प्रकल्‍प बंद केला आहे.  मा.आ.श्री.संग्राम जगताप यांच्‍या प्रयत्‍नातून  या जागेवर स्‍मशानभूमी व उदयानासह इतर प्रकल्‍प प्रस्‍तावित करण्‍याचे ठरावही मनपाने केला आहे. त्‍यासाठी आरक्षणातील वापरावयाचे प्रयोजन बदलण्‍यासाठी शासनाची मंजूरी घेतली जाणार आहे. मात्र आरक्षित जागेतील 40 टक्‍के जागेच्‍या वापराबाबत आयुक्‍तांच्‍या अधिकारात निर्णय घेतला असून तातडीने याभागामध्‍ये कोरोना रूग्‍णांच्‍या अंत्‍यविधी होणार आहेत. तरी याच जागेवर आता कायम स्‍वरूपी स्‍मशानभूमी केली जाणार असल्‍याचे प्रतिपादन मा.श्री.सपंत बारस्‍कर यांनी केले.

      उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे यांनी काल पासून सावेडी कचरा डेपो परिसराची स्‍वच्‍छता मोहिम हाती घेवून शेड मधील साफ सफाई तसेच अग्निशामक बंबाच्‍या पाण्‍याने धुवून स्‍वच्‍छ केले. या ठिकाणी मोठया प्रमाणात अंत्‍यविधी करण्‍यासाठी जागा उपलब्‍ध झाली आहे.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post