राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 'या' तारखेपर्यंत लांबणीवर

 राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णयमुंबई:राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाचा निर्णय घेण्यात आला आहे.  यापूर्वी 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.  कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post