जिल्ह्याचे चार मंत्री काय करतायत? पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात...

जिल्ह्याचे चार मंत्री काय करतायत? पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात...

आ.राधाकृष्ण विखेंची घणाघाती टिकानगर : नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांना लगावत सगळी मदार खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडली आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे. एबीपी माझा  वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करताना दिसत आहे. राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post