महत्वाची बातमी...१८ एप्रिलला RTGS सुविधा सुमारे 14 तास बंद राहणार

 महत्वाची बातमी...१८ एप्रिलला RTGS सुविधा कमीत कमी 14 तास बंद राहणारनवी दिल्लीः रविवारी 18 एप्रिल रोजी रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट RTGS सुविधा कमीत कमी 14 तास चालणार नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  सोमवारी दिली. तांत्रिक सुधारणा आणि आरटीजीएसच्या चांगल्या व्यवहारासाठी यंत्रणा अद्ययावत केली जात आहे. त्यासाठी ही सेवा 14 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी त्यांचे महत्त्वाचे काम अगोदरच करून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आरबीआयने लेखी नोटीस बजावलीय.

आरबीआयने सांगितले की, “सदस्य बँका आपल्या ग्राहकांना पेमेंट ऑपरेशनच्या योजनेबद्दल माहिती देऊ शकतात. आरटीजीएस सदस्यांना सिस्टम प्रसारणाद्वारे माहिती देत राहू. त्याच वेळी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) प्रणाली सामान्यपणे सुरू राहील.

आतापर्यंत फक्त बँकांना आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंट सुविधा वापरण्याची परवानगी होती. परंतु गेल्या आठवड्यात केंद्रीय बँकेने नॉन-बँक पेमेंट सिस्टम ऑपरेटरसाठी एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधांचा विस्तार केला. अशा परिस्थितीत आता प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय), कार्ड नेटवर्क आणि एटीएम ऑपरेटर रिसिव्हेबल्स डिस्काऊंटिंग सिस्टम (TReDS) प्लॅटफॉर्म NEFT आणि RTGS मोड वापरू शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post