शासकीय तंत्रनिकेतन येथे १५० बेडसचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित

 महापालिका व रोटरीच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे १५० बेडसचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित


दृढनिश्चय व एकत्रित प्रयत्नातून करोनाची दुसरी लाटही रोखण्यात यश मिळेल : ईश्वर बोरानगर- नगर जिल्ह्यासह शहरात करोनाचा विळखा घट्ट झाला आहे. कोविड रूग्णांसाठी बेड कमी पडत असल्याने शहरातील ५ रोटरी क्लबने एकत्र येत महापालिकेच्या मार्फत पुन्हा एकदा बुरुडगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १५० बेडसचे सुसज्ज रोटरी कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले आहे. याठिकाणी रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली असून येथे आवश्यक सुविधा मोफत दिल्या जात आहेत. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सेक्रेटरी ईश्वर बोरा, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सेक्रेटरी दिगंबर रोकडे, रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्ष गिता गिल्डा, सेक्रेटरी देविका रेळे,    रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफीक मुन्शी, सेक्रेटरी सुयोग झंवर,  रोटरी मेनचे अध्यक्ष अमित बोरकर, सेक्रेटरी पुरूषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.
ईश्वर बोरा म्हणाले की, कोविड महामारी ही मानवतेसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. त्यावर सगळ्यांनी एकत्र येत दृढनिश्चय करून मात करायची आहे. आज वाढती रूग्णसंख्या पाहता रोटरीने महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा १५० बेडसचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी दाखल होणारा प्रत्येक रूग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतेल असा विश्वास आहे. 
आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, करोनाची दुसरी लाट भयंकर असली तरी पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन रूग्णांचे जलद विलगीकरण करून लाट रोखता येऊ शकते. रोटरीसारख्या सामाजिक संस्था या संकटकाळात देत असलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. येथील कोविड सेंटरमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांना विनामुल्य सेवा देण्यासाठी मनपाची वैद्यकीय टिम तैनात करण्यात आली आहे.
प्रसन्न खाजगीवाले म्हणाले की, रोटरी मार्फत नेहमीच भरीव समाजोउपयोगी कामे विविध शैक्षणिक,व्यवसाईक क्षेत्रातील व सर्व वयोगटातील अंतिम घटकापर्यंत पोहचेल असे असून ही विधायक कार्यात तात्काळ निर्णय हे आपल्या रोटरीचं खरं वैशिष्ट्य आहे. त्यातूनच रोटरी कोविड केअर सेंटरचे दुसरे पर्व आम्ही सुरू केले आहे. येथील सकारात्मक वातावरण रुग्णांना दिलासा देणारे ठरेल. 
क्षितीज झावरे म्हणाले की, मागील वर्षी या कोविड केअर सेंटर मधून जवळपास १६७५ हून अधिक रुग्ण बरे होऊन हसतमुखाने घरी परतले. यावेळीही येथे रूग्णांसाठी नियमित तपासणी बरोबरच आम्ही सकस व पौष्टिक आहार, मनोरंजन अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. या सेवेचा रुग्णांना चांगला लाभ होईल.
गिता गिल्डा म्हणाल्या की, या कोविड केअर सेंटरमध्ये महिलांसाठीही स्वतंत्र व चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वीचा अनुभव असल्याने अतिशय प्रभावी उपचार सेवा याठिकाणी रुग्णांना निश्चित मिळेल. महामारी गंभीर असली तरी आम्ही खंबीरपणे त्याला तोंड देण्यास सज्ज आहोत.
रफीक मुन्शी म्हणाले की, आताच्या काळात करोना रोखण्यासाठी रुग्णांचे विलीनीकरण व वेळेवर उपचार आवश्यक आहे. हेच महत्त्वाचे काम रोटरी सामाजिक बांधिलकीतून करत आहे. तसेच याठिकाणी पुढे ॲाक्सिजन बेड ची सुविधा सुरु करण्याबाबत ही आम्ही प्रयत्नशील आहोत.
अमित बोरकर म्हणाले, आताच्या सर्वात मोठ्या आपत्तीत लोकांची सेवा करण्यासारखे दुसरे पुण्य नाही. रोटरीचे सर्व सदस्य यात समर्पित भावनेने योगदान देत आहेत. सामूहिक प्रयत्नांतून आपण लवकरच ही दुसरी लाट थोपवू असा विश्वास आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post