रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री, डॉक्टर दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री, डॉक्टर दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखलनगर:  रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळा बाजार विक्री करणाऱ्या दोघा मेडिकल चालकांसह डाॅक्टर दांपत्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार मधील म्हस्के हाॅस्पिटलचे डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के, डॉ. कौशल्या किशोर म्हस्के (दोघे रा. वडारवाडी, भिंगार), प्रसाद दत्तात्रय अल्हाट (वय 27 वर्ष रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर), रोहित अर्जुन पवार (वय 22 रा. साकत ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

औषध प्रशासन विभागाचे जावेद शेख यांनी फिर्याद दिली आहे. प्रसाद अल्हाट व रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली असून म्हस्के डाॅक्टर दांपत्य पसार झाले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. 15 रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post