करोना लसीऐवजी कुत्रा चावल्यानंतरचे रेबीजचे इंजेक्शन... आरोग्य यंत्रणेचा असाही प्रताप

 करोना लसीऐवजी कुत्रा चावल्यानंतरचे रेबीजचे इंजेक्शन... आरोग्य यंत्रणेचा असाही प्रतापलखनऊः उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक आरोग्य केंद्रात करोनावरील लसीचा डोस देण्याऐवजी कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारं अॅन्टी रेबीजचं इंजेक्शन दिलं, अशी तक्रार तीन महिलांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. असं झालं असेल तर दोषींवविरोधात कडक कारवाईचा इशाराही दिला आहे. शाल्मली जिल्ह्यातील कांधला आरोग्य केंद्रात तीन महिला आपलं आधार कार्ड घेऊन करोनावरील लस घेण्यासाठी गेल्या होत्या. यातील अनारकली (वय ७२), सरोज (वय ७०) आणि सत्यवती (वय ६०) यांचा समावेश आहे.

हे प्रकरण शामली जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेलं. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समिती आधी तक्रार करणाऱ्या महिलांचा जबाब घेईल. यानंतर संबंधित आरोग्य केंद्रात जाऊन चौकशी करेल. या चौकशीत जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं शामलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post