आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे

 


आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहेपंढरपूर- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेला संबोधित केले. खा. रणजित नाईक निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी मंत्री सुभाषराव देशमुख, विजयराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, गोपीचंद पडाळकर, राम सातपुते, जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, संजय भेगडे, लक्ष्मणराव ढोबळे आणि इतरही सहकारी उपस्थित होते. यावेळी मांडलेले मुद्दे असे: 

- आपण सारे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, यापेक्षा आपण सारे मास्क घालून उपस्थित आहात, याचा मला अधिक आनंद आहे.

मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला आपण मैदानात उतरविले आहे. विकासाची नवीन वाट मंगळवेढा, पंढरपूरला दाखविण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देणार हे नक्की.

- लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे होत नाही. त्यामुळे 15 वर्ष जे सत्तेत होते, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका.

वीज बिलांना स्थगिती दिली, तेव्हा वाटले राजा उदार झाला. पण, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले आता वसुली सुरू

- 17 चे मतदान झाले की, हे सरकार पुन्हा 18 पासून तुमची वीज कापणार.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित कोण, तर मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटींची सूट दिली.

गरिब, शेतकरी यांना मात्र मदत करायला पैसा नाही, हे सांगणारे हे सरकार

- पूर्वी हे सरकार होते, महाविकास आघाडी!

नंतर झाले, महाविनाश आघाडी!

आणि आता झाले, महावसुली आघाडी!!!

आज पोलिसांना हप्तेवसुलीचे टार्गेट दिले जात आहेत.

- सरकारमध्ये आले, तेव्हा बांधावर जाऊन सांगायचे, 50 हजार देऊ, दीड लाख देऊ.

आपण आज 2000 रूपये कुणाला मिळाले नाही.

हे म्हणाले कर्जमुक्ती देऊ. पण, आज जनतेला या सरकारपासून मुक्ती मागण्याची वेळ आली आहे.

- उस उत्पादकांना सर्वाधिक मदत करण्याची भूमिका मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने घेतली. साखर आणि साखर उद्योगाला वाचविण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले.

- आमच्या सरकारच्या 5 वर्षांत काळात सिंचनासाठी मोठी कामे प्रारंभ करण्यात आली. दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम केले.

35 गावांमध्ये पाण्यासाठी प्रत्येकवेळी आश्वासन दिले जाते. पण, होत काही नाही. जो निधी लागेल, तो थेट दिल्लीहून आणू.

- आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे.

सारे मंत्री आत्ममग्न, अख्ख सरकार आत्ममग्न!

कोरोनात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात.

ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, बेड नाही, अशी अवस्था केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post