कोंबड्या अंडे देईनात, पोल्ट्रीचालकाची थेट पोलिसात तक्रार

 

कोंबड्या अंडे देईनात, पोल्ट्रीचालकाची थेट पोलिसात तक्रार



पुणे: कोंबड्या अंडी देत नसल्यामुळे पुण्यातील एका पोल्ट्री चालकाने खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी सदोष खाद्यामुळे मागील आठ दिवसापासुन अंडी देणे बंद केले आहे. यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतापलेल्या पोल्ट्री चालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी 4 एप्रिल रोजी एका कंपनीचे कोंबड्या करिता खाद्य घातले होते. ते खाद्य दररोज दिले जात होते. ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले. यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणे बंद केले आहे, असे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post