जिल्हा पोलिस दलातील ६ पोलिसांना पोलीस पदक जाहीर

 जिल्हा पोलिस दलातील ६ पोलिसांना 'पोलीस पदक' जाहीरनगर: पोलीस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील 799 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना ही पदके जाहिर केली आहेत. यात जिल्हा पोलीस दलात काम करणार्‍या सहा पोलिसांचा समावेश आहे.

सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख केल्याबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद अर्जुन चिंचकर, राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस हवालदार कृष्णा बबनराव विधाटे, पोलीस हवालदार विश्‍वास अर्जुन बेरड, पोलीस नाईक शरद मारूती बुधवंत, देवेंद्र दिलीप शेलार, तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखविल्याबद्दल पोलीस शिपाई गणेश कलगोंडा पाटील यांना हे पदक जाहिर झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post