माजी सैनिकाच्या खून प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, पोलिस निरीक्षकांची बदली तर दोघं निलंबित

माजी सैनिकाच्या खून प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, पोलिस निरीक्षकांची बदली तर दोघं निलंबितनगर-  पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील माजी सैनिकांच्या हत्येप्रकरणी तक्रार दाखल करण्यास चालढकल करून आरोपींच्या तपास कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप राठोड व पोलीस हवालदार शिवनाथ बडे यांना निलंबित केले आहे. तर पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली. निरीक्षक डेरे यांची बदली झाल्याने त्यांच्याजागी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अरविंद जोधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथे हॉटेल समोर चारचाकी वाहन लावण्याच्या वादातून आठ ते नऊ जणांनी माजी सैनिक विश्वनाथ कारभारी फुंदे यांना बेदम मारहाण केली होती. यात फुंदे यांचा मृत्यूू झाला. मयत फुंदे यांचा भाऊ मच्छिंद्र फुंदे यांनी याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कानडगाव (ता.राहुरी) डोंगरात पाठलाग करून सुधीर संभाजी शिरसाठ, आकाश पांडुरंग वारे, आकाश मोहन डुकरे व गणेश सोन्याबापू जाधव यांना जेरबंद केले आहे.

या प्रकरणानंतर फुंदे टाकळी ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. यामध्ये स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीचा समावेश होता.

उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी वरिष्ठाकडे अहवाल पाठवला. त्यानंतर अधीक्षक पाटील यांनी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची नियंत्रण कक्षात तत्काळ बदली करून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस हवालदार शिवनाथ बडे यांना निलंबीत केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post