शरद पवारांची चिठ्ठी.... आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

शरद पवारांची चिठ्ठी.... आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतमुंबई:  शुक्रवारी सकाळीच काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपलं वर्षभराचं वेतन करोनाविरोधातल्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ काँग्रेसचे सर्व आमदार एका महिन्याचं वेतन देणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्याच स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व आमदार आणि खासदार आपला एका महिन्याचा पगार मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १ कोटी रुपयांची स्वतंत्र मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: नोट लिहून यासंदर्भात पक्षाला सूचना केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post