देशात करोनाचा उद्रेक, पंतप्रधान प्रचारसभात मग्न....७० वर्षातील बेफिकीर व बेजबाबदार पंतप्रधान

 देशात करोनाचा उद्रेक, पंतप्रधान प्रचारसभात मग्न....७० वर्षातील बेफिकीर व बेजबाबदार पंतप्रधान

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टिकामुंबई: देशात कोरोनाचा उद्रेक झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारसभा घेण्यात मग्न आहेत. गेल्या 70 वर्षात देशाने असला बेफिकीर आणि बेजबाबदार पंतप्रधान पाहिला नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर देणे नितांत गरजेचे असताना 130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात. असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या 70 वर्षात देशाने पाहिला नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post