आठवीतील मुलगाही सांगेल ठाकरे सरकार पडणार

 आठवीतील मुलगाही सांगेल ठाकरे सरकार पडणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भाकीतपंढरपूर:  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये विल पॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असं पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post