मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल.... चंद्रकांत पाटील यांचा टोला

 

मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल.... चंद्रकांत पाटील यांचा टोलाकोल्हापूर: लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल. त्यानंतर ते निर्णय घेतील, अशा शब्दात चंद्रकातंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोना अशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post