पारनेर तालुक्याला कोट्यवधींचा निधी, सुजित झावरे यांनी केला खा.विखेंचा सत्कार

 पारनेर तालुक्याला खा. विखेंच्या माध्यमातून २३ कोटींचा निधी 

सुजित झावरे पाटील यांची माहितीपारनेर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याने खासदार सुजय विखे पाटील यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या रस्त्यांच्या कामांना सुरूवात होणार आहे. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांची दैना कायमचीच फिटणार आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तालुक्यातील डिकसळ ते जामगाव रस्ता,राष्ट्रीय महामार्ग ६१,वडगाव आमली ते भांडगाव जामगाव, दैठणे गुंजाळ रस्ता, सुपा ते अपधुप बाबूर्डी रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ६१, तिखोल ते किन्ही, करंदी, पुणेवाडी ते राज्य मार्ग ६८ रस्ता या चार रस्त्यांसाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत टाकळी ढोकेश्वर गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा वासुंदे चौक ते टाकळी ढोकेश्वर बसस्थानक रस्त्यासाठी २५ लाख रुपये तसेच काकणेवाडी ते पिंपळगाव तुर्क रस्ता करणे १५ लाख यासह ८ रस्त्यांसाठी २ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल खासदार सुजय विखे पाटील यांचे तालुक्याच्या वतीने सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

टाकळी ढोकेश्वर तसेच काकणेवाडी गावातील रस्त्यासाठी ग्रामस्थांची बऱ्याच दिवसाची मागणी होती यासाठी सुजित झावरे पाटील यांनी खा. सुजय विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. विखे यांनी देखील पारनेर तालुक्यास झुकते माप दिले आहे.यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, राहुल पाटील शिंदे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया अमोल साळवे, अॅड.बाबासाहेब खिलारी, अरूणराव ठाणगे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवाजी खिलारी, नारायण झावरे, संतोष भंडारी, किसनराव धुमाळ, बापु रांधवण, गणेश चव्हाण, धोंडीभाऊ झावरे, संजय झावरे, दीपक साळवे, राजेंद्र काकडे, भाऊसाहेब खिलारी, विलास झावरे, संजय उदावंत, कासम पठाण तसेच टाकळी ढोकेश्वर गावातील व्यापारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होत0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post