पारनेर तालुक्यात कडकडीत लॉकडाऊनला पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद,

 

पारनेर तालुक्यात कडकडीत लॉकडाऊनला पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद, अण्णा हजारे यांनीही केले आवाहनपारनेर तालुक्यात दिवसेंदिवस करोना बांधिताची संख्या वाढतच आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी होत नसल्याने पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी येत्या पाच दिवस संपूर्ण तालुका बंदचे आदेश दिले आहेत. काल गुरुवारी पहिल्या दिवशी तालुकाभर चांगला प्रतिसाद मिळाला.

पारनेर तालुक्यात आतापर्यंत करोनामुळे शंभरपेक्षा जास्त नागरिकांनी प्राण गमवले असून मोठ्या संख्येने करोनाबाधित उपचार घेत आहे. राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लावलेले असून ते संपण्याच्या आधीच तहसीदार देवरे तालुक्यातील वाढती बाधीताची संख्या पहाता आगामी पाच दिवस संपुर्ण तालुका बंदचे आदेश दिले. तालुक्यात करोनाच्या दुसरी लाट आल्यावर प्रशासनाच्यावतीने कोरठण खंडोबा, पिंपळगाव रोठा येथील भक्त निवासात कोविड सेंटर चालू केले. मात्र रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने आ. नीलेश लंके यांनी पुन्हा मोठे आव्हान स्वीकारीत भाळवणीत कोविड सेंडर सुरू करून सामान्यांना दिलासा दिला आहे.

मात्र, दररोज सरासरी शंभरच्या आसपास करोना बाधीत सापडत असल्याने तालुका प्रशासनाने करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्णय घेतला आहे. पारनेर शहरासह सुपा, निघोज, कान्हुरपठार, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी या मोठ्या गावांमध्ये रुग्णाची संख्या जास्त आहे. तर अन्य छोट्या गावामध्ये रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे तालुक्यातील निघोज, कान्हुर पठार, शिरापुर कर्जुलेहर्या, कडुस या गावांनी आधीच कोविड सेंटर चालू केले आहेत. रुग्ण संख्य दिवसंदिवस वाढत असल्याने तहसीदार देवरे यांनी कडक आदेश काढत रुग्णालये व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करोना नियम मोडून बाहेर फिरणे अथवा व्यवसाय दुकाने चालू ठेवणार्‍यांकडून हजार रुपये दंड वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post