स्वतःची २२ लाखांची आलिशान गाडी विकून गरजूंना प्राणवायू देणारा 'ऑक्सिजन मॅन'

 

 स्वतःची २२ लाखांची आलिशान गाडी विकून गरजूंना प्राणवायू देणारा ऑक्सिजन मॅनमुंबई : महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. अशा संकटसमयी मुंबईच्या मालाड येथील एक तरुण पुढे आला आहे. ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहनवाज शेख एका फोन कॉलद्वारे रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी परिसरात कार्यरत आहे. 

संकटात अशावेळी ऑक्सिजन घेण्यास लोकांना अडचण येऊ नये म्हणून त्याच्या पथकाने एक ‘नियंत्रण कक्ष’ उभारला आहे. शाहनवाज म्हणाला की, काही दिवसांपूर्वी परिसरातील लोकांना मदत करण्यासाठी 22 लाख रुपयांची एसयूव्ही विकली आहेत. फोर्ड एन्डिव्हॉवर विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून शाहनवाजने गरजूंना देण्यासाठी 160 ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतले. ,गेल्या वर्षी गरिबांना मदत करताना पैशाची कमतरता भासली होती म्हणूनच त्याला आपली कार विकावी लागली.

गेल्या वर्षी ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याच्या मित्राच्या पत्नीचा रिक्षामध्ये मृत्यू झाला. या घटनेने शाहनवाजचे मन पोखरुन काढले. त्यानंतर मुंबईतील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करण्याचे त्याने ठरवले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post