नगरमध्ये १00 टक्के सेंद्रिय व विषमुक्त धान्य व आंबे उपलब्ध

 अश्वमेध उत्पादीत सेंद्रिय पिकांचे १00 टक्के विषमुक्त धान्य व आंबा महोत्सव शुभारंभ

सेंद्रिय पद्धतीने घेतलेली उत्पादने खाणे गरजेचे : आ. संग्राम जगतापनगर : कोरोना संसर्ग विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर

विपरित परिणाम झाला आहे. कारण दिवसेंदिवस नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत चालल्यामुळे या विषाणूचं संक्रमण आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रासायनिक खतांपासून शेती उत्पादने, फळे, भाजीपाला आदींसह इतर अनेक उत्पादनांचे सेवन प्रत्येकजण करीत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यास आवश्यक ती रोगप्रतिकारक शक्ती यांमधून मिळत नाही. यासाठी सेंद्रीय पद्धतीने शेती उत्पादने घेतलेले आहाराद्वारे प्रत्येक व्यक्तीस मिळाले पाहिजे. यासाठी अश्वमेध यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले उत्पादने १00 टक्के विषमुक्त धान्य व आंबा महोत्सवाचे स्टॉल शहरामध्ये

ठिकठिकाणी लावणे गरजचे असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

पाईपलाईन रोडवरील यशोदानगर येथे अश्वमेधने सेंद्रिय उत्पादीत केलेले धान्य व आंबा

महोत्सवाचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, नगरसेवक स्वप्निल शिंदे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक निखिल वारे, भाजपचे प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, वसंत लोढा, प्रशांत धाडगे, संपत नलवडे, अश्वमेधचे संचालक मंगेश निसळ, नितीन शिंदे, सुरेश निसळ, सचिन निसळ, अभिजित निसळ आदी उपस्थित होते.

यावेळी संचालक मंगेश निसळ म्हणाले की, सेंद्रिय खतापासून पिकविलेले शेती उत्पादने थेट

शेतकरी ते ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम अश्वमेधच्या माध्यमातून आम्ही सुरु केले आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत मान्यताप्राप्त आत्मा अंतर्गत सेंद्रिय गट शेतीद्वारे उत्पादीत केलेले १०0 टक्के विषमुक्त शेती उत्पादने ग्राहकांना देण्याचा आमचा मानस असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, गिरगाईचे दूध, तूप, ऑर्गेनिक गुळ, देवगड, नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली देवगड, रत्नागिरी व हापूस आंबा ग्राहकांसाठी अल्पदरात उपलब्ध केले आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना संचालक नितीन शिंदे म्हणाले की, गेल्या ३ वर्षापासून जलसमृद्धी अँग्रोटेकच्या माध्यमातून अश्वमेधच्या ब्रॅडच्या अंतर्गत ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली उत्पादने ग्राहकांना पूर्वीत असल्यामुळे या कंपनीस आयएसओ ९00१ - २0१५ चे मानांकन प्राप्त झाले आहे. गाव तिथे अश्वमेध शेतकरी आधारकेंद्र सुरु करणे आमचा मानस आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सेंद्रिय खतापासून उत्पादीत केलेली शेती उत्पादने मिळण्यास मदत होणार आहे. याचबरोबर रासायनिक शेती करणाऱ्यांनाही सेंद्रिय शेतीकडे वळविण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post